सिन्नर – सिन्नर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व सिन्नर पंचायत समितीच्या माजी उपसभापती विजया सुदाम सांगळे तथा सांगळे आक्का (९२) यांचे सोमवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पति माजी सभापती अॅड. सुदामदाजी सांगळे, तीन मुले, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सहा दशकांहूनही अधिक काळ सिन्नरच्या समाजकारण व राजकारणात महत्वाचे योगदान देणाऱ्या आक्का प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन होत्या. राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या आक्कांनी सिन्नर महिला मंडळाची स्थापना केली होती. त्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सगूणाबाई प्राथमिक विद्यामंदिर ही तालुक्यात नावाजलेली शाळा चालवली जाते. सुदामदाजी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तालुक्यात समाजवादी चळवळ वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान होते, आणिबाणी विरोधातील आंदोलनातही त्या सक्रीय होत्या. राज्य शासनाचा २००९- १० चा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला होता.