सिन्नर शहरात लॉकडाऊनच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लूट थांबवा; नाशिक ट्रान्सपोर्ट व गुड्स ट्रान्सपोर्टची मागणी
नाशिक : सिन्नर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्या वाहतुकदारांची मात्र बेकायदेशीर लूट केली जात असून सदर लूट थांबाबवी तसेच लॉकडाऊन मधून अत्यावश्यकत सेवेत काम करत असलेल्या वाहतूक क्षेत्राला वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम सैनी व सिन्नर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील ढाने यांनी केलेली आहे. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सिन्नर तहसीलदार यांना दिले आहे.त्यावेळी सुभाष जांगडा, अजय जाधव,दत्ता ढमाले,शरद खालकर,वाशिम सय्यद , उत्तम कातकाडे ,दीपक अहिरे,विनायक तांबे,बळीराम कदम,इकबाल सय्यद आदी सोबत होते.
निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सिन्नर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र या भागात एमआयडीसीक्षेत्र नियमित सुरु आहे. असे असतांना या ठिकाणाहून मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना नगरपालिका विभागाकडून नोटीस देण्यात येत असून याठिकाणी येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. वास्तविक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांचा सिन्नर शहरातील लॉकडाऊन विभागास कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. या भागात एमआयडीसी सुरु असल्याने आपत्कालीन सेवेत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरु राहणे आवश्यक असतांना ट्रान्सपोर्ट उद्योजकांना नोटीसा देण्यात येत आहे. तसेच वाहतूकदारांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट करण्यात येत आहे. तरी आपत्कालीन परिस्थितीत कुठलाही अडथळा निर्माण न करता सुरु आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय नियमित सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.