सिन्नर – तालुक्यामध्ये कोरोनाबळींचे सत्र सुरूच आहे. रविवारीही (३० ऑगस्ट) दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोनांबे येथील ६५ वर्षीय रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहरातील शिंपी गल्ली जवळील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या ६५ वर्षीय रुग्णाचा नाशिकच्या मविप्र रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हृदयविकार आणि मधुमेह याचा त्यांना त्रास होता. तीन दिवसांपूर्वी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारच्या दोन मृत्यूंमुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आता ३५ झाली आहे.