नाशिक – जिल्हयातील सिन्नर तालुका वगळता उर्वरीत नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, बागलाण व देवळा या तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदासाठी १२ व १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सिन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र आदेश पारीत करणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे.
जिल्हयात १३ तालुक्यातील ६१९ ग्रामपंचयातीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहे. सदर ग्रामंपचातींची सरपंच व उपसरपंच निवडणूक घेण्यासाठी हे आदेश पारित करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे दहीवडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत उच्च न्यायालय येथे रिट पिटीशन दाखल झाले आहे. त्याबाबत ५ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने आदेश पारीत करुन १६ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक न घेण्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे सिन्नर तालुका वगळता ही निवडणूक होणार आहे. काय आहे जिल्हाधिकारी यांचे आदेश
……