सिन्नर – शहरातील ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन व इलेक्ट्रीक बँटरीचे दुकान फोडणारे आंतर जिल्हयातील गुन्हेगार पोलिसांनी जेरबंद केले आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांनी ही कामगिरी अवघ्या ११ दिवसात केली आहे. या प्रकरणात शेख आजिम शेख बादशाह ( वय ४६, टाकळीगाव, ता. खुलताबाद, जिल्हा – अौरंगाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तीन साथीदारासह ही घरफोडी केल्याची कबूली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १० लाख ५२ हजार ९९७ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीचे सुमारास याआरोपींनी सिन्नर शहरातील उद्योगभवन व संगमनेर नाका परिसरातील अविनाश कॉर्बेो प्रायव्हेट लिमीटेड ट्रान्सपोर्ट कंपनीचे गोडाऊन व न्यु इंडिया ऑटो झलेक्ट्रीक अॅण्ड बँटरीचे दुकानाचे शटर वाकवत आत प्रवेश करुन कंपनीचे पार्टस, लोखंडी मोटर, पंप, इलेक्ट्रीक मोटर, ग्राईडर व्हील तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बेंट-या असा किमती माल चोरुन नेला होता. सिन्नर पोलिस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे हालवत या आरोपींचा शोध घेतला.
जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक अनिल वाघ, प्रितम लोखंडे, प्रविण सानप, निलेश कातकडे, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.