सिन्नर – जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सिन्नर तहसील कार्यालय येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला ,सिन्नर शहर आणि तालुक्यात वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय झाला आहे. आणि त्यासाठी बंधन पाळले पाहिजे अन्यथा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल आणि त्याचा त्रास सर्वांना होईल असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सर्व विभागांचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. त्यानंतर गंगावेस ते भाजीबाजार ते नेहरू चौक ते बस स्टँड असे पायी चालून भाजीबाजार आणि पेठेतल्या दुकानांची तपासणी केली असता कजरी मिठाई दुकान येथे कोरोना नियमाचे उल्लंघन करून विक्री सुरू असल्याचे दिसल्याने हे दुकान पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले. तसेच जय मल्हार खानावळ येथे सुद्धा कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्याने दंड व चौकशी चे आदेश दिले. त्यानंतर सोनी kids वेयर येथे तपासणी करून लहान मुलांना विना मास्क दुकानात आणल्यामुळे मुलाच्या आईला २०० रुपये दंड केला व अशा विनामास्क व लहान मुलांना घेऊन येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये अश्या सूचना दुकांदारास दिल्या.
सर्व हॉटेल मालकांनी त्यांच्या हॉटेल मधील ५० टक्के टेबल काढून टाकणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले.
ज्या दुकानांना बसण्यास जागा नाहीआणि जे दुकान बंधिस्त नाही. त्यांनी फक्त पार्सल दिले पाहिजे ,तेथे उभा राहून खाण्यास मनाई आहे असे निर्देश दिले. त्यानंतर ccc इंडिया bull येथे भेट देऊन पाहणी केली व सुधारणा बाबत निर्देश दिले, मुख्याधिकारी ,तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना रोज तपासणी करून धाडी टाकून कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. त्यास अनुसरून धाड सत्र सुरू करण्यात येणार आहे. यावेळी प्रांत पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, बीडीओ मुरकुटे हजर होते.