सिन्नर – कोविड केअर सेंटर इंडिया बुल्स, मुसळगाव येथे गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाने, योगासन व कोविड विषयी आरोग्यदायी माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी सागर बाळासाहेब गायकवाड यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधून त्यांना आरोग्य विषयक उपयुक्त माहिती दिली.
रुग्णांचे आत्मिक मनोधर्य, मानसिक समाधान मिळण्याकरिता स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी योगासन, अनोलोम विलोम प्राणायाम, ओमकार गजर, इत्यादी योगासन प्रकार घेण्यात आले.आरोग्यविषयक माहिती आणि सकारात्मक संवाद यावेळी कोविड पॉसिटीव्ह रुग्णांशी साधण्यात आला.रुग्णांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मार्गदर्शन केले. रुग्णासाठीअन्न पाकीट वाटप करण्यात आले. यात पुरी भाजी, व गोड बर्फी होती. या प्रसंगी कोविड केअर सेंटरच्या आरोग्य कर्मचारी, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांचा गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे मॅडम, सुरज परदेशीं औषध निर्माण अधिकारी, श्रीमती. जयश्री मुंढे , शुभांगी शिंदे , लता केदार, ममता वसावे ,अनिता सारुक्ते,अस्मिता घुटे हे सर्व उपस्थित होते. गेल्या एक वर्षा पासून कोविड केअर सेंटर येथील परिचारिका निरंतर व मनोभावे रुग्णसेवा करीत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता सोनावणे मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव केला.