सिन्नर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी लीना बनसोड यांनी आज सिन्नर तालुक्यातील कोविड केअर सेंटर इंडिया बुल्स येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी
रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला, रुग्णांच्या डिस्चार्ज पॅालीस बद्दल त्यांनी चर्चा केली. यावेळी कोविड रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला.
या भेटीनंतर त्यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटरला भेट देऊन तेथील नियोजनाचा आढावा घेतला व कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी डीसीएससी येथे वाढीव मनुष्यबळ देणेकामी नियोजन झाले असून अॅाक्सीजन सॅज्युरेशन नॅार्मल असणाऱ्या व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सीसीसी अथवा गृहविलगीकरणमध्ये शिफ्ट करण्याच्या सूचना दिल्यात.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विजय नगर येथील कंन्टेमेन्ट झोनला भेट देऊन तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. हाॅटस्पॅाट मधील आरएटी कॅम्पला देखील भेट देऊन आशा स्वयंसेवीकेकडून गृहविलगीकरणच्या रुग्णांना भेटीसंबंधीच्या सूचना दिल्या. नगरपालिका क्षेत्रामध्ये व ग्रामीण क्षेत्रामध्ये आरएटी व आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्याबद्दलच्या सूचना केल्या, विजय नगर येथून विंचूर दळवी येथे लीना बनसोड यांनी दिलेल्या भेटीत संस्थात्मक विलगीकरण भेट देऊन तेथील रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. संपूर्ण तालुक्यात संस्थात्मक विलगीकरणची पद्धत अवलंबवावी अशा सूचना केल्या.
या भेटीदरम्यान तहसीलदार राहुल कोताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलकांदे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव,वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुळकुटे, उपमुख्याधिकारी रोहित पगार, डॉ. लहू पाटील,डॉ. प्रशांत खैरनार ,ग्रामसेवक ,नगरसेवक ,विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .