सिन्नर – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या व इंधन दरवाढीच्या विरोधात सिन्नर तालुका काँग्रेसच्या वतीने पक्षाचे मुख्यालय असलेल्या सांगळे कॉम्प्लेक्स, चौदा चौक वाडा येथे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, प्रभारी उत्तम राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, तालुका समन्वय उदय जाधव’ जाकीर भाई शेख’ त्र्यंबक सोनवणे ,शिवराम दादा शिंदे, रावसाहेब थोरात, दामू अण्णा शेळके, ज्ञानेश्वर लोखंडे ,सोमनाथ बिडवे वामनराव उकाडे , बाळासाहेब शिंदे ,संजय लोखंडे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीनाताई देशमुख, शहर महिला अध्यक्ष मोकळताई ,अंबादास भालेराव, हेमंत क्षीरसागर,अतुल शिंदे ,विमल देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी हिमनदी क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. अतुल शिंदे यांची तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.या दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर कपूर व यांच्या पत्नी यांचे निधन झाल्याने त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी काँग्रेसने केंद्राच्या धोरणावर जोरदार टीका केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीने हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमांवर मागील शंभर दिवसापासून जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आत्तापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहे. ही तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेल स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढलेले आहेत. इंधनावर अवाच्या सव्वा कर लावून केंद्र सारखा दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर व गॅस सिलेंडर ८५० रुपये झाला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील बदलामुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे केंद्राच्या धोरणाविरोधात हे उपोषणाचे आंदोलन करण्यात आले आहे.