नाशिक – सिन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार माणिकराव कोकटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा माहिती आरोग्य विभागाने दिली. यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ,राहुल आहेत,आमदार नरेंद्र दराडे यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्यापाठोपाठ आता कोकाटेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकोटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करवून घेतली. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. कोकाटे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत आपल्या मतदारांना कोरोना संसर्गाची माहिती देत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
माझ्या मतदारसंघातील प्रिय बंधू आणि भगिनीना माझा सप्रेम नमस्कार
आज तुमच्या सोबत ह्या सामाजिक माध्यमातून संवाद साधत आहे, त्यामागील कारण ही तुमची गैरसोय होऊ नये. मागील आठवड्यात मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागले. सध्याच्या कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी देखील त्यावेळी घेतली होती मात्र न कळत काही कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्क या काळात झाला. सिन्नरला आल्यानंतर तब्बेतीत बिघाड जाणवल्याने मी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले. चाचणी केल्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आलेलो आहे. मी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेऊन ट्रिटमेंट घेत आहे, त्यामुळे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही कोणीही माझ्या संपर्कात यू नये, भेटायला येऊ नये, अत्यंत महत्वाचे काम असल्यास माझे स्वीय सहाय्यक यांना संपर्क करावा अथवा सिन्नरच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, तुम्ही प्रत्येकाने देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, ही विनंती-

आमदार माणिकराव कोकाटे