नाशिक – महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत येणाऱ्या महापारेषणच्या अंबड १३२/३३ उपकेंद्रावरील अंबड ३३/११ केव्ही उपकेंद्र येथून निघणाऱ्या वाहिन्यांचा वीज पुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार ९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे,तरी ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
यामध्ये अंबड- २ या ३३/११ केव्ही उपकेंद्र अंतर्गत असलेल्या नीरज, सनी,नीलचंद, झायलोग,इसोवोल्टा आणि सरुल या ११ केव्ही वाहिन्या बंद राहणार आहेत. तसेच गंगामाई कॉम्प्लेक्स, सीम्न्स जवळील पीएपी प्लॉट्स, किर्लोस्कर, सीटीआर, इनोव्हा रबर यासोबतच अश्विन नगर ११केव्ही वाहिनी अंतर्गत अश्विन नगर, पाथर्डी फाटा, स्वामी विवेकानंद नगर, महेंद्र कॉलनी, बीएसएनएल क्षेत्र उत्तम नगर ११ केव्ही अंतर्गत पंडित नगर, भद्रपत सेक्टर, उत्तम नगर, सिडको सहावी योजना, राजरत्न नगर उपेंद्र नगर ११ केव्ही अंतर्गत शुभम पार्क, माणिक नगर, साईग्राम, गणेश कॉलनी, प्रसन्न नगर, एकदंत नगर तसेच विल्होळी सिडको ११ केव्ही वाहिनी अंतर्गत पाथर्डी फाटा, गरवा हॉटेल. पांडवलेणी क्षेत्र, कानीबरी, रिलायन्स टॉवर, हरिविश्व अपार्टमेंट, ज्ञानपीठ, ज्ञानगंगा, फाळके स्मारक, वनक्षेत्र या भागाचा समावेश आहे. तरी या भागातील ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.