नाशिक – सिडकोतील प्रभाग क्रमांक २७, २८ व २९ मधील पाणीपुरवठा काही दिवसांपासून विस्कळीत झाला असून यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी न मिळणे तसेच कमी दाबाने पाणी मिळणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांच्या तक्राीर आहे. त्याचे निवारण होत नसल्याचे निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे – दराडे व पती बाळा दराडे यांनी नागरिकांसह पाथर्डी फाट्या जवळील जलकुंभावर चढून निषेध नोंदविला. यावेळी फलकावर पाणीपुरवठा अधिकारी धारणकर यांना निलंबित करा, पाणी पळवणा-या भाजपचा जाहीर निषेध….असे म्हटले आहे.