नाशिक: शहरासह परिसरात सोमवारी रोजी दुपारी पावसाने चांगलीच दाणादाण सुमारे तासभर चाललेल्या पावसामुळे सिडको, इंदिरानगर, सातपूर, अंबड गाव, कामटवाडे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर हातगाडी विक्रेते आणि भाजीविक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.
सिडको भागात काही ठिकाणी रस्त्यांची कामे आणि भूमीगत कामे सुरू असून पावसामुळे या ठिकाणी चांगला चिखल निर्माण झाला होता. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र दुपारी एक वाजता अचानक जोरात पाऊस आला सुमारे तासभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
बदलत्या हवामानामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन-चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या महीनाभरापासून नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने अनेक धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तास राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच आणखी दोन दिवस नाशिक, नगर, जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .