नाशिक : राहत्या घरात विषारी औषध सेवन करून ६५ वर्षीय वृद्धेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२६) दुपारी उघडकीस आली. अनुसया नंदु मोरे (६५, रा. शिवाजी चौक, सिडको) असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरे यांनी रविवारी दुपारी राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाबत निदर्शनास येताच त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.