नाशिक : सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर भागात राहणा-या २८ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनाली राहुल घुगे (२८ रा.रो- हाउस नं.१ अथर्व रेसि.) असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. सोनाली घुगे यांनी बुधवारी (दि.२९) सायंकाळपूर्वी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक वरंदळ करीत आहेत.