नाशिक – आंघोळीसाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना उंटवाडी परिसरात घडली. सदर मुलगा नंदिनी (नासर्डी) नदीत आंघोळीसाठी गेला होता. डबक्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
यश रवी जाधव (रा.शिवनगर, शिवशक्तीचौक सिडको) असे मृत बालकाचे नाव आहे. यश जाधव शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घरा नजीकच्या स्मशानभूमी जवळील नासर्डी नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेला होता. डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी त्यास पाण्याबाहेर काढले. आई सोनी जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मयत घोषीत केले.