नाशिक – सिडकोतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोविड संशयित रुग्णाचा आज मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनेची वाच्यता झाली. तर अंबड पोलिस याप्रकरणी चौकशी करीत असून पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दरम्यान या घटनेचा आयएमएने निषेध केला असून संबंधित नातलगांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.