मुंबई – सिग्नल अॅपही आता पूर्णपणे व्हॉट्सअॅपचा अनुभव देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध असलेले फिचर्स अॅड करण्याचा कंपनीचा प्रयत्न चालला आहे. जगभरातील कोट्यवधी युझर्स व्हॉट्सअॅपला सोडचिठ्ठी देऊन सिग्नलकडे वळल्यानंतर हे सारे बदल घडू लागले आहेत. सध्या सिग्नलमध्ये जे नवे फिचर्स अॅड केले आहेत त्यात अबाऊट, वॉलपेपर्स आणि चॅटसारखे ऑप्शन्सचा समावेश आहे.
वॉलपेपर – व्हॉटसअॅप बिटा ट्रॅकर WABetaInfo च्या अहवालानुसार सिग्नल ५.३.१ च्या अँड्रॉईड व्हर्जनमध्ये नवे चॅट वॉलपेपर फिचर दिले आहेत. ते अॅक्सेस करण्यासाठी युझरला सिग्नल अॅपच्या सेटींगमध्ये जाऊन Appearance ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट वॉलपेपरवर क्लिक करावे लागेल. सिग्नलवर २१ प्री-सेट वॉलपेपर आहेत. सोबतच चॅटींगसाठी डार्क थीमचा वापर करता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या वतीने चॅट वॉलपेपरचे ऑप्शन फार सुरुवातीलाच देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कस्टम वॉलपेपरचे ऑप्शन जोडण्यात आले आहे.
अबाऊट – सिग्नल अॅपमध्ये कस्टम अबाऊट ऑप्शन जोडण्यात आले आहे. ते युझर्सला आपला कॉन्टेन्ट आणि स्टेटस अॅड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. हे प्रोफाईल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. सिग्नल अॅपच्या सेटींग मेन्यूमध्ये जाऊन ते सेट करता येऊ शकते. व्हॉट्सअॅपमध्ये हे ऑप्शन पूर्वीपासून उपलब्ध आहे.
सिग्नल एनिमेशन – सिग्नल अॅपमध्ये दिवसानुसार अॅनिमेटेड स्टीकर्स जोडण्यात येत आहेत. सिग्नल डेस्कटॉप अॅप युझर्सला नवे अॅनिमेटेड स्टीकर तयार करण्याचा पर्यायही देत आहे. व्हॉट्सअॅपने हे फिचर गेल्या वर्षी जुलैमध्ये जोडले होते. सिग्नल अॅपमध्ये लो-डेटा मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे कमी डेटा कॉलिंग करणे शक्य आहे. व्हॉट्सअॅपमध्ये हे देखील पहिलेपासूनच आहे.