मुंबई – व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी पॉलिसी बदलल्याने ग्राहकांनी व्हॉट्सअॅप वापरण्याचे बंद करुन तुलनेने सुरक्षित असलेले सिग्नल हे मेसेजिंग अॅपला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच सिग्नल वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे. याची दखल घेत सिग्नलने अनेक फिचर्समध्ये नवीन बदल करण्याचे ठरवले आहे. नव्या बदलांनुसार आता व्हॉट्सअॅपमध्ये असणारे अनेक फिचर्स सिग्नल अॅपमध्येसुद्धा उपलब्ध होणार आहेत.
सिग्नलमध्ये नवे फिचर्स कोणते? आहेत ते आता जाणून घेऊ या….
कस्टम वॉलपेपर :
व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे वॉलपेपर ठेवता येतात. हे फिचर पहिल्यांदा सिग्नल या अॅपमध्ये नव्हते. मात्र, यानंतर ही सुविधा सिग्नलकडून पुरवली जाणार असून वेगवेगळ्या व्यक्तींसोबत चॅटींग करताना वापरकर्त्यांना वेगवेगळे वॉलपेपर ठेवता येणार आहे.
व्हिडीओ कॉलिंगची सुविधा :
व्हॉट्सअॅपवर एकाच वेळी ८ जणांना व्हिडीओ कॉल करता येतो. लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअॅपने फिचरमध्ये तसे अपडेट केले होते. सिग्नल अॅपमध्ये ही मर्यादा ५ व्यक्तीपुरती आहे. मात्र, सिग्नल अॅप वर व्हॉट्सअॅपसारखे फिचर देणार असून सिग्नलमध्येही एकाच वेळी ८ जणांना व्हिडीओ कॉल करता येणार आहे.
अॅनिमेटेड स्टिकर्स:
व्हॉट्सअॅपमध्ये अॅनिमेटेड स्टिकर्सचा एक अतिशय उत्तम पर्याय युजर्सना उपलब्ध आहे. चॅटिंग करताना युजर्स या अॅनिमेटेड स्टिकर्सचा उपयोग करु शकतात. तसेच, व्हॉट्सअॅपप्रमाणे स्वत:चे स्टिकर्स तयार करण्याची सुविधासुद्धा सिग्नल देणार आहे.
मॅसेज बुकमार्कची सुविधा:
कोणत्याही महत्त्वाच्या मेसेजला स्टार करण्याची सुविधा व्हॉट्सअॅपमध्ये आहे. या फिचरमुळे संपूर्ण चॅट डीलिट झाली तरी, स्टार केलले मेसेच सेव्ह करुन ठेवण्यास मदत होते. सिग्नल अॅपमध्ये अशा प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे आता सिग्नलसुद्धा आपल्या युजर्सना मेसेज स्टार करण्याचे फिचर देणार आहे.
ऑटोमॅटिक डाऊनलोड:
सिग्नल अॅपमध्ये फोटो, व्हिडीओ किंवा दुसऱ्या फाईल ऑटोमॅटिक डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये सिग्नलसुद्धा ऑटोमॅटिक मीडिया डाऊनलोड करण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन देणार आहे.
अबाऊट स्टेटस ७ ऑप्शन :
सिग्नल अॅप प्रोफाईल सेक्शनमध्ये ७ अबाऊट स्टेटस ऑप्शनचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. तर व्हॉट्सअॅपमध्ये एकूण ११ अबाऊट स्टेटसचे ऑप्शन आहेत. अशा प्रकारचे स्टेटस ऑप्शन्स आहेत.
लो डेटा मोड :
व्हॉट्सअॅप वापरताना कमी डेटा खर्च व्हावा यासाठी लो डेटा ओपनचा पर्याय व्हॉट्सअॅपकडून पुरवला जातो. तर सिग्नलमध्ये सध्या अशी कोणतीही सुविधा नाही. मात्र, सिग्नल आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आपल्या युजर्सना ही सुविधा देऊ शकते.
सजेशन्स फॉर फॉरवर्ड :
कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना व्हॉट्सअॅपतर्फे युजर्सना कोणाला मेसेज पाठवावा, यासाठी सल्ले दिले जातात. तसे सल्ले देण्याची सुविधा सिग्नलमध्ये नाही. मात्र, यानंतर सिग्नल आपल्या अॅपमध्ये तशी सुविधा उपलब्ध करुन देऊ शकते.