सिंह राशीवर यंदा शनीचा राहणार असा प्रभाव
अन्य राशींप्रमाणे प्रमाणे सिंह राशीवर देखील शनीच्या नक्षत्र बदलाचा शुभाशुभ परिणाम जाणवणार आहे. मुळातच सिंह राशीचा स्वामी रवी आहे. रवी व शनी यांचे फारसे सख्य नाही, दुसरे म्हणजे शनी नक्षत्र बदल करीत असलेले श्रवण नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे. चंद्र हा शनीचा मित्र ग्रह आहे. त्यात शनी सिंह राशीच्या सहाव्या भावामध्ये विराजमान आहे. अशा मित्र व शत्रू ग्रहांच्या परिस्थितीमधून शनीची वाटचाल आहे त्याकरता सिंह राशी असलेल्यांनी थोडासा स्वभावाचा बाज बदलून योग्य तिथे तडजोडीची भावना स्वीकारणे गरजेचे आहे. आपला स्वभाव व आपले हटवादी विचार सहाव्या नकारात्मक भावातील शनीच्या स्वभावाच्या विपरीत जाऊ शकतात.
आपण स्वतःहून जुने वाद उकरून काढू नये. सुवर्णमध्य साधावा. शैक्षणिक बाबतीत अपयश आल्यास पुन्हा जोरदार प्रयत्न करावा. नेहमीपेक्षा व्यापक दृष्टीकोन ठेवावा. मी, माझे, माझ्यापुरते असे न ठेवता आपण आपले आपल्यापुरते असे व्यापक दृष्टीने बघावे. कोर्टकचेरीच्या वादांमध्ये शक्य असल्यास तडजोडीची भावना स्विकारावी. संपूर्ण फायदा आपलाच करण्याऐवजी फिफ्टी-फिफ्टी भूमिका घ्यावी. सेवाभाव वृत्ती वाढवावी. सेवाकार्यात स्वतःला गुंतवावे. अनेक ठिकाणी सहनशीलतेची गरज पडणार आहे. प्रत्येक बाबतीतली आपली क्षमता ओळखल्यास अधिक ताकदीने प्रयत्न करता येतील. गुण आणि दोष याची परिपूर्ण जाणीव या काळात आपल्याला ठेवावी लागणार आहे. कौटुंबिक तसेच परिचीतांशी संबंध किरकोळ कारणासाठी ताणले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषतः शत्रू ग्रह रवी, चंद्र आपल्या लग्न ठिकाणी असल्यास आपल्या निर्णय व शब्दांवर लक्ष ठेवावे.
……
असा देईल शनी शुभ फळे
या काळात शनीची महादशा अथवा अंतर्दशा असल्यास त्याचा सर्वच बाबतीत आपणास फायदा होईल. सरकारी विभाग, प्रशासन, राजकीय क्षेत्र, चिकित्सा क्षेत्र, संशोधन, इंटेरियर, धातू संबंधातील, इंजिनीअरिंग, संगीत, फोटोग्राफी, खेळ, टेक्स्टाईल या क्षेत्रात अधिक प्रगतीच्या संधी निर्माण होतील. या तसेच वरील प्रमाणे स्वतःमध्ये बदल केल्यास हा काळ सहज निघून जाईल.
या लेखमालेतील पुढची रास उद्या बघू…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.