नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाची तयारी आता विविध समित्यांच्या माध्यमातून केलेल्या नियोजनामुळे वेगाने आकार घेत आहे. या साठी विविध कामांची आखणीव तपशील निश्चित केले जात असून त्या कामासंदर्भातील निविदा (Tenders) जारी केल्या आहेत. यामध्ये खालील कामाच्या संदर्भातील सशुल्क निविदा अर्ज संमेलनाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. १. मंडप / व्यासपीठ / प्रवेशद्वारे/ दालने उभारणे २. केटरिंग व भोजन व्यवस्था ३. ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना / एल.सी.डी. स्क्रीन व्यवस्था, जनरेटर्स इत्यादी ४. फोटोग्राफी व व्हिडीओ शूटिंग ५. प्रिंटिंग व स्टेशनरी – ओळखपत्रे,बिल्ले, स्मरणिका, लेटर हेड, पाकिटे, सन्मानपत्र वगैरे ६. स्मृतिचिन्हे ७. बॅचेस, सॅनिटरी मफलर्स, मास्कइत्यादी ८. वाहतूक व्यवस्थेसाठी कार्सव बसेस ९. हाऊस किपींग (स्वच्छता व्यवस्था) १०. सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षारक्षक. तरी सर्व संबंधितांनी यासाठीसंमेलन कार्यालयात त्वरित संपर्क साधावा. अधिकमाहितीसाठी ०२५३ २३१५९०५,९४०४९०१६४६, ९४०५५००४६४ किंवा abmss94.nashik@gmail.com वरसंपर्क करावा.