मुंबई/नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार याबाबत चर्चा रंगत असली तरी हे संमेलन नाशिकला होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. साहित्य महामंडळाच्या ३ जानेवारी रोजी होणा-या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अगोदर कोरोनाच्या संकटामुळे साहित्य संमेलनाचे स्वरुप निश्चित होईल. त्यानंतर कोठे घ्यायचे यावर चर्चा होईल. त्यासाठी जागा निश्चितीसाठी १५ दिवसही घेतले जाईल. पण, निर्णय हा नाशिकचाचा असणार आहे.
नाशिकसाठी लोकहितवादी मंडळ व सावानाचा प्रस्ताव असले तरी हे संमेलन लोकहितवादी मंडळाला मिळणार आहे. या संमेलनासाठी दिल्ली अमळनेर, सेलु येथून प्रस्ताव आले आहे. पण, दिल्ली येथे संमेलन घेण्याचा प्रस्ताव देणारे सरहदचे संजय नहार यांनी हे संमेेलन मे मध्ये घेण्याचा आग्रह केला आहे. त्याबाबात त्यांनी इंडिया दर्पणशी बोलतांना सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे थोडा वेळ आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत कडाक्याची थंडी असते. त्यामुळे मे मध्ये दिल्यास महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे संमेलन करता येईल. दुसरीकडे महामंडळापुढे आर्थिक वर्षाची अडचण आहे. सरकार अनुदान देत असल्यामुळे त्याला आर्थिक वर्षात संमेलन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे संमेलन नाशिकलाच मिळण्याची शक्यता असल्याचे लोकहितवादीच्या एका पदाधिका-याने सांगितले. पुढील वर्षाचे संमेलन मात्र दिल्लीला होवू शकते.
अमळनेर व सेलुचा प्रस्ताव असला तरी नाशिक व दिल्ली हे दोन मोठे दावेदार आहे. त्यामुळे ९४ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद नाशिकला मिळणार आहे.