नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्चअखेरीस होत असून या संमेलनात नाशिक जिल्ह्यतील सर्व लेखकांच्या पुस्तकांचे एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याची वाद्यग्मयीन परंपरा वाचकांसमोर आणण्याचा प्रयन्त आयोजकांनी सुरु केला आहे. त्या साठी नाशिक जिल्ह्यातील लेखकांनी आपापल्या पुस्तकांच्या दोन प्रति १५ मार्च २०२१ पूर्वी कुसुमाग्रज नागरी, गोखले एजुकेशन सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालय व संशोधन केंद्र, कॉलेज रोड नाशिक इथे पाठवावीत, असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगनराव भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, समिती समन्वयक विश्वास ठाकूर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, भगवान हिरे, संजय करंजकर, किरण समेळ यांनी केले आहे.