नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू झाली असून स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक आज ११ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज नगरी, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कार्यालयात समितीचे अध्यक्ष आणि संस्कृत भाषा सभा नाशिकचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडली.
यात प्रामुख्याने संपूर्ण संमेलन सूत्रबद्धतेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयंसेवकांच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. त्याच बरोबर साहित्यापासून दूर असलेल्या वर्गाला या प्रक्रियेशी मोठ्या प्रमाणात कसे जोडून घेता येईल आणि स्वयंसेवेबरोबर युवा पिढीवर जास्तीत जास्त चांगले वाङ्मयीन संस्कार कसे होतील यावरही चर्चा झाली. या बैठकीला विश्वास ठाकूर, दिलीप साळवेकर, सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. संतोष मोरे, दीपक पाटील, श्रध्दा कापडणे, वेदांशु पाटील, शुभम शेंडे, भूषण काळे आदी मान्यवर उपस्थित होते.