बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साहित्य संमेलनाच्या जागेची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

by Gautam Sancheti
जानेवारी 10, 2021 | 10:40 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210110 WA0020

नाशिक –  कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले.
साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी आज त्यांची भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पस मध्ये होत असलेल्या संमेलन स्थळाची नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे,  मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासोबत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गोखले एज्युकेशनचे प्रमुख एम.एस.गोसावी, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, भगवान हिरे, संजय करंजकर सुनील भुरे, किरण समेळ, प्राचार्य डॉ.कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ याठिकाणी ते काम बघतील असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य राहील तसेच देशभरातून येणाऱ्या या सर्वांचे स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग; पालकमंत्र्यांची माहिती

Next Post

शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed 3

शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011