नाशिक – डॉ. अनिल अवचट यांचे लेखन समाजाला दिशा देणारे आहे. उपेक्षित, शोषित, वंचित घटकांचे जग त्यांनी आपल्या साहित्यातून उभे केले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट यांची निवड करण्यात यावी या मागणीचे निवेदन संमेलनाचे संयोजक जयप्रकाश जातेगावकर यांच्या कडे झेन फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांना लिहिलेल्या निवेदनात डॉ. अनिल अवचट यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उंचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल असे म्हटले आहे. या निवेदनावर गिरीश उगले – पाटील, चंद्रशेखर महानुभाव, जितेंद्र भावे, स्नेहल सावळे, विकास पाटील, सुमित शर्मा, एकनाथ साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी लोकहितवादी मंडळाचे सचिव सुभाष पाटील, संयोजन समितीचे डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर उपस्थित होते.
संमेलनाच्या तयारीला वेग आला असून नाशिक शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी गाठी संयोजन समितीचे सदस्य घेत आहे. लवकरच साहित्य संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु होण्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.