भोजन व अल्पोपहार समितीत महिलांचाही सहभाग
भोजन व अल्पोपहार समितीची दुसरी बैठक नुकतीच संपन्न झाली. जेवण व नाश्त्याचा दर काय असावा ? भोजन कोणत्या प्रकारचे असावे, जागेची निश्चिती यावर प्राथमिक चर्चा झाली. समिती प्रमुख उमेश मुंदडा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले पुढच्या बैठकीत सभासदांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. लवकरच भोजन कक्षाची जागाही निश्चित करण्यात येणार आहे.
या समितीला काही महिला मंडळ सहकार्य करणार आहेत. त्यांना २ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. भोजन कक्षात जास्त गर्दी होते. यासाठी कोरोना सुरक्षित योग्य अंतर राखण्याची काळजी घेण्यात येईल. संमेलन काळात दररोज नाश्ता आणि २ जेवण राहतील. चहा कॉफी दिवसभर राहील. सचिन संगीत दातार, योगेश वर्मा यांनी मेनू (भोजनातील पदार्थ) विषयी काही महत्वाच्या सूचना केल्या. या वेळी अमोल पगारे, शौनक जाखडी, वैशाली जोशी, अविनाश क्षीरसागर, शैलेश नाटकर, मधुरा देवकुटे उपस्थित होते.
…..
स्वागत समिती बैठकीत नियोजनावर भर
नाशिक – संमेलनासाठी देशातल्या विविध भागातून नामवंत साहित्यिक व मान्यवर येणार आहेत. तसेच रसिकही येणार आहेत. या सर्वांचे स्वागत उत्साहाने व आनंदाने झाले पाहिजे. त्यासाठी नियोजनाची गरज आहे. असे मत स्वागत समितीच्या प्रमुख विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी व्यक्त केले. स्वागत समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
२६मार्चचा उद्घाटन समारंभ २८ मार्चचा समारोपाचा कार्यक्रम निमंत्रितांचे कवी संमेलन, परिसंवाद असे अनेक महत्वाचे कार्यक्रम आहेत. त्यासाठी कोअर कमिटीची बैठक होईल.
उपप्रमुख प्रमोद पुराणिक म्हणाले, समितीत ४० सभासद आहेत. ५ कक्ष स्थापन करून त्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. कमीतकमी २५ स्वयंसेवकांची गरज भासेल. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रम होतील. त्यासाठी कामाचे वेळापत्रक आखले जाईल. यावेळी लक्ष्मीकांत कोतकर, किरण समेळ, प्रकाश धारणे, जान्हवी जोशी, संगीत चव्हाण यांनी काही सूचना केल्या. यावेळी तोरल टकले, प्रकाश धारणे, मनोज आमले, कविता कर्डक, दिगंबर जोशी, कौस्तुभ जोशी, जी. पी. खैरनार, स्वाती कुलकर्णी, स्वाती निकम उपस्थित होते.
…..
बाल कुमार मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार
मराठी साहित्य संमेलना अंतर्गत बालकुमार मेळाव्या संदर्भात पालक कमिटी सदस्य व मेळावा समिती प्रमुख व उपप्रमुख यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. संमेलनात अधिकाअधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असावा याकरिता जिल्हापरिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत संमेलनाचे उद्दिष्ट पोहोचावे. ग्रामीण भागातील मुलांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग असावा याबाबतच्या कार्यप्रणाली संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. लीना बनसोड यांनीही अत्यंत आपलेपणाने या बाबतीत लक्ष घालून पुढील कारवाईचे आदेश दिले. बालकुमार मेळाव्यात जास्तीतजास्त मुलांचा आणि बालसाहित्यिकांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने कल्पक सूचना नाशिककरांनी कराव्यात असही आवाहन संजय करंजकर व संतोष हुदलीकर यांनी सर्व नाशिककरांना केले आहे.
……
बाल कुमार मेळाव्यात विद्यार्थी सहभागाविषयी चर्चा
मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत नियोजित बालकुमार मेळावा समितीची आज रोजी महत्वाची बैठक सार्वजनिक वाचनालयाच्या बालविभागात संपन्न झाली. ९३ वर्षानंतर प्रथमच बालसाहित्याला या संमेलनात विचारात घेतले जाणार असल्याने बालकुमार मेळावा अधिक देखणा व यशस्वी व्हावा याकरिता नाशिक जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक प्रांतात नावाजलेल्या व्यक्तींचा समितीत समावेश आहे. समितीच्या आजच्या बैठकीत सर्व उपसमित्यांचे सर्वच सदस्य उपस्थित होते. या बालमेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने मुलांची उपस्थिती अपेक्षित असल्याने अनेक मान्यवर सदस्यांच्या सकारात्मक सूचनांचे स्वागत करण्यात आले. या बालकुमार मेळाव्यात बालकवी कट्टा, बालकथा कट्टा, परिसंवाद व प्रतिथयश बालसाहित्यिकांशी गप्पा-गोष्टी अशा साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. म्हणूनच आजच्या बैठकीत गप्पागोष्टी या कार्यक्रमात संभाव्य निमंत्रित प्रतिथयश साहित्यिकांच्या नावांची चर्चा करण्यात आली. त्यातील काही नावांना सर्वांनी पसंती दर्शविली. परिसंवाद व गप्पागोष्टी या कार्यक्रमात अंतिमतः सहभागी असणाऱ्या ज्येष्ठ बालसाहित्यिकांची नावे लवकरच निश्चित केली जातील अशी माहिती बालकुमार मेळावा समितीचे पालक समन्वयक संजय करंजकर यांनी दिली. बालकुमार मेळाव्याचे नियोजन अत्यंत चोख व समाधानकारक असल्याचा विश्वास समितीचे प्रमुख संतोष हुदलीकर यांनी व्यक्त केला. समितीतील प्रत्येक सभासद उत्साहाने आणि झोकून देऊन काम करत असल्याने बालकुमार मेळावा हा मराठी साहित्य संमेलनातील लक्षवेधी भाग ठरेल असे समितीचे उपप्रमुख योगिनी जोशी तसेच सोमनाथ मुठाळ यांनी सांगितले.