नवी दिल्ली – साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराने लुईस यांचा सन्मान करताना अतिव आनंद होत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या कवितांमधून अनेक प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या भावना हाताळल्याचे समितीने सांगितले आहे. २००६ मध्ये त्यांनी लिहिलेल्या अव्हेर्नो या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराद्वारे ग्लुक यांना १० दशलक्ष स्वीडन डॉलर मिळणार आहेत.