नाशिक – साहित्यसखी महिला मंच व ‘आम्ही लेखिका’ नाशिक द्वारा ‘सावित्री उत्सव ३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली आहे. प्रत्येकीने सावित्रीमाईसारखी आडवी कुंकवाची चिरी लावून (सावित्रीबाईंसारखा पूर्ण वेष केलात तर उत्तमच) १ ते२ मिनिटांचा व्हिडिओ तयार करुन त्याद्वारे ‘मी लेक सावित्रीची’ या विषयावर समाजासाठी एक चांगला संदेश द्यायचा आहे.
असे आहे स्पर्धेच्या नियम व अटी
– कपाळावर आडवी चिरी लावणे आवश्यक आहे.
– संदेश संवादातून, गाण्यातून, कवितेतून वा स्वगतातून दिला तरी चालणार आहे परंतु त्यात ‘मी लेक सावित्रीची’ ही ओळ असणे आवश्यक
– सदर स्पर्धा निःशुल्क आहे.
– व्हिडियोबरोबर आपले पूर्ण नाव ,शहराचे नाव पाठवा तसेच व्हिडियोत सुरुवातीस ‘साहित्यसखी व आम्ही लेखिका नाशिक आयोजित सावित्री उत्सव २०२१’ असा उल्लेख करून मग आपले नाव,शहर यांचा उल्लेख असावा.
– मोबाईल आडवा धरून व्हिडियो करावा व ३ जानेवारी पर्यंत व्हिडिओ आपापल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करावा.
– #साहित्यसखीसावित्रीउत्सव202* – हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावा व सदर व्हिडिओची लिंक त्याच दिवशी आम्हाला पाठवावी.
– स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. आपल्या घरातील लहान मुलींचेदेखील व्हिडियो पाठवू शकता.
– परीक्षकांनी दिलेल्या गुणांवरून सर्वोत्तम ५ व्हिडियो निवडण्यात येतील. निकाल १ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल.
– २०२१ या वर्षात नाशिक येथे होणाऱ्या तिसऱ्या साहित्यसखी राज्य महिला साहित्यसंमेलनात विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
– पुढील व्हाट्सप् क्रमांकावर तुमच्या फेसबुक वॉलवरील व्हिडियोची लिंक पाठवावी.
मो.9657131719