मुंबई – सोशवल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकवर जवळपास प्रत्येक भारतीय आहे. मात्र सिक्युरिटीच्या हिशेबाने विचार केला तर फेसबुक अत्यंत धोकादायक ठकरू शकते, याचा अंदाज बहुतांश लोकांना नाही. फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात लोकांना खासगी डेटा लिक झालेला आहे.
जगभरातील ५० कोटी लोकांच्या मोबाईल क्रमांकाशी संबंधित संपूर्ण माहिती लिक झाली आहे, असा दावा मदरबोर्ड नावाच्या कंपनीने केला आहे. हे मोबाईल क्रमांक Telegram bot वर विकले जात आहेत. यात जवळपास ६ लाख भारतीय युझर्सचाही डेटा आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सिक्युरिटी संशोधक एलन गलने सर्वांत पहिले ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.
मदरबोर्ड कंपनीच्या अहवालानुसार एका युझरचा डेटा २० डॉलर म्हणजे १४५० रुपयांमध्ये विरला जात आहे. जो युझर टेलिग्राम बोट वापरत आहे तो फेसबुकच्या कोणत्याही देशातील कोणत्याही अकाऊंटशी संबंधित कॉन्टॅक्ट नंबर प्राप्त करू शकतो. अशा प्रकारची समस्या गेल्यावर्षी देखील निर्माण झाली होती.
अशात जर युझर आपल्या मोबाईल नंबरला सिक्युअर करू इच्छितात तर त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून मोबाईल नंबर हटवून टाकावा. त्यासाठी फेसबुक एप ओपन करून अकाऊंट सेटींगमध्ये जावे. त्यात जनरल आप्शनमध्ये नंबर आप्शनमध्ये जावे. यात नाव, इ-मेल आणि मोबाईल नंबर दिसेल. त्यात फोन आप्शनमध्ये जावे. पुढे Remove From Your Account ऑप्शन वर क्लिक करा. यात मोबाईल क्रमांक दिसेल.
पुन्हा एका फेसबुकचा पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतरच मोबाईल क्रमांक हटविता येईल. यापूर्वी २०१९ मध्ये ४१.९ कोटी फेसबुक युझर्सचा डेटा असुरक्षित सर्व्हरवर आढळला होता. कंपनीने तातडीने ही समस्या दूर केली. जगभरातील शंभर देशांमध्ये सध्या फेसबुक डेटा लिक झाला आहे. भारतात ही संख्या ६१ लाख ६३ हजार ४५० आहे.