नवी दिल्ली – आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान जेवढे उपयुक्त आहे तेवढाच त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो. आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा गैरवापर केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. याच संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘डीपफेक’ नामक तयार करण्यात आले असून त्याद्वारे तरुण मुलींचे व महिलांचे खोटे फोटो तयार केले जात असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे.
डीपफेकवर छायाचित्रात फेरबदल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींचे व महिलांचे फोटो मिळवले जात असून त्याद्वारे गैरप्रकार होत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा सायबर क्राईमचा भाग असून महिलांनी फोटो पोस्ट करतेवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याचे यातून उघड झाले आहे. मुलींचा चेहरा विनाकपड्यांच्या चित्रांवर चिटकवले जात आहे. सेन्सिटीच्या अहवालानुसार ज्या मुलींच्या फोटो संदर्भात गैरप्रकार घडला त्याची माहिती मुलींना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यातील बहुतेक मुलींचे वय १८ वर्षाखालील होते. या अंतर्गत १ लाखाहून अधिक मुलींची छायाचित्रे व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. अशी छायाचित्रे व्हायरल करण्यासाठी टेलिग्राम अॅपचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे तरुण मुली व महिलांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतेवेळी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा सॉफ्टवेअर आणि अँप्लिकेशन संबंधी सायबर सेलमध्ये तक्रार करावी असे मार्गदर्शन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.