पुणे – कोरोना काळात सायबर चोरटेही सक्रीय झाल्याने सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. डिजिटलायझेशनकडे मार्गक्रमण करतांना त्यातील संभाव्य धोके नव्यने पुढे येत आहे. केवायसी संदर्भात काही जणांना फसवणुकीचे मेसेज आल्याचे उघडकीस आले आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश जण डिजिटल पेमेंटकडे वळाले आहे. कॅशच्या देवाणघेवाणीतून कोरोनाची लागण होत असल्याच्या भीतीने सर्वानी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडला आहे. परंतु याच काळात सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या काळात हॅकींचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत असतात. अशातच आता काही जणांना फ्रॉड मेसेज येत असल्याचे उघड झाले आहे. यात केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले जाते. दिलेल्या नंबरवर फोन करण्यासाठी ग्राहकांना सांगितले जाते व त्याद्वारे ग्राहकांचे पैसे बळकावले जातात. संबंधित मेसेज खोटे असून कोणत्याही बँकेतर्फे असे मेसेज पाठवण्यात येत नसल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे असे कोणतेही मेसेज आल्यास घाबरून न जाता तत्काळ सायबर सेलला माहिती द्यावी असे सायबर सेलतर्फे सांगण्यात आले आहे.
– केवायसी अपडेट संदर्भांत कोणत्याही प्रकारचे मेसेज ग्राहकांना पाठवले जात नाही. त्यांमुळे अशा फसवणुकीला बाली न पडता तत्काळ तक्रार दाखव करावी.
विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
खालील मेसेजपासून सावधान