नवी दिल्ली – सध्या काळात डिजिटल माध्यमावर विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असूनही चेक क्लिअरन्स, अनेक प्रकारची कर्जे इत्यादी संबंधित सर्व प्रकारच्या सेवांसाठी आपल्याला बँक शाखेत जावे लागेत. अशा परिस्थितीत आपल्याला बँकांच्या सुट्यांविषयी माहिती असणे आवश्यक असते, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे आपल्याला बँकिंगचे काही काम करायचे असेल तर बँकांच्या सुट्टीबाबत नक्की ही माहिती जाणून घ्या….
२५ डिसेंबर
शुक्रवारी नाताळ (ख्रिसमस) सण आहे. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय सुट्टी असेल. यामुळे या दिवशी बँका दिवसभर बंद राहतील.
२६ डिसेंबर
बँका प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार येत आहे, त्यामुळे बँका बंद राहतील.
२७ डिसेंबर
रविवारी २७ डिसेंबरला साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे बँका बंद राहतील.
अशा परिस्थितीत, जर आपल्याला या आठवड्यात बँकांशी संबंधित काही काम करायचे असेल तर गुरुवारपर्यंत ते पूर्ण करा, कारण त्यानंतर २५, २६ आणि २७ डिसेंबर रोजी बँका सुटी राहणार आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस देशातील जवळपास सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील.
त्यानंतर या दिवशीही बंद
३० डिसेंबर रोजी यू किआंग नंगबाहच्या निमित्ताने शिलाँग झोनच्या शाखांमध्ये सुट्टी असेल. तर ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयझाल झोनमध्ये बँका बंद ठेवल्या जातील.