नवी दिल्ली – बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातील लीक झालेल्या व्हॉट्सअँप चॅटनंतर त्याच्या गोपनीयतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे सायबर तज्ज्ञांनी आता व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याचा इशारा दिला आहे.
ऑटोमॅटिक फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड फीचरसह व्हॉट्सअँप हॅक होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दि सनच्या अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड फीचर वापरणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ऑटोमॅटिक फोटो डाउनलोडचा फायदा घेऊन हॅकर्स व्हॉट्सअॅप हॅक करू शकता अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही सुविधा तत्काळ बंद करून आवश्यकतेनुसार फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड करण्याची सूचना सायबर तज्ज्ञांनी दिली आहे.
फोनमधील ऑटोमॅटिक फोटो डाउनलोडचा पर्याय तत्काळ बंद करावा असे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय व्हॉट्सअँपच्या सेटींगमध्ये वेब किंवा डेस्कटॉपचा पर्याय असतो. कोणत्याही लॅपटॉपवर ही सुविधा चालवू नये, असे त्यांनी सांगितले आहे. मध्यंतरी बारकोडद्वारे व्हॉट्सअँप हॅक होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून सायबर तज्ज्ञांनी या सूचना दिल्या आहेत.