मुंबई – संपूर्ण राज्यात सध्या हवामान कोरडं असले तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे. मंगळवारी विदर्भ मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तापमानातही अपेक्षित वाढ सुरू झाली असून आगामी २ दिवसात २ ते अंशांची वाढ अपेक्षित असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.