मुंबई – स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरात येणारे उपकरण आहे. मोबाईलच्या सतत होणाऱ्या वापरामुळे बॅटरी संपते आणि फोन वारंवार चार्ज करावा लागतो. परंतु चुकीच्या पद्धतीने मोबाईल चार्ज केल्यामुळे फोनच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते.
चला आज जाणून घेऊयात त्या चुकांबद्दल ज्या सहसा फोन चार्ज करताना केल्या जातात.
वारंवार फोन चार्जिंगला लावणे
स्मार्टफोन तज्ज्ञांच्या मते फोन वारंवार चार्ज केल्याने बॅटरीवर दबाव येतो. नेहमी लक्षात ठेवा की फोनची बॅटरी २० टक्के किंवा त्याहून कमी झाल्यानंतरच फोन चार्जिंगला लावावा. त्यामुळे बॅटरीवर दबाव पडणार नाही व ती खरब देखील होणार नाही.
फास्ट चार्जिंगसाठी
अनेकदा फोन लवकर चार्ज करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपचा उपयोग केला जातो. मात्र हे अॅप बॅकग्राउंड सतत अॅक्टीव्ह राहत असल्याने बॅटरी लवकर खर्च होते. तसेच डाटा लिक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर थर्ड पार्टी अॅपचा उपयोग टाळावा.
फोन चार्ज करताना
सहसा लोक मोबाईल कव्हर सहीतच फोन चार्जिंगला लावतात. त्यामुळे देखील बॅटरीवर दबाव येऊन ती खराब होऊ शकते. फोन चार्ज करताना नेहमी कव्हर काढून ठेवावे. त्याऐवजी एखादे पातळ कापडाचा वापर करावा. ज्याने डिस्प्ले आणि बॅटरी दोन्ही चांगले राहतील.
मोबाईल कोणत्याही चार्जर ने चार्ज करणे
बरेचदा मोबाईल सोबत मिळालेल्या चार्जर ऐवजी इतर कोणत्याही चार्जरने फोन चार्ज केला जातो. त्याने देखील बॅटरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे फोन कायम सोबत मिळालेल्या चार्जरनेच चार्ज करावा.