मुंबई – राज्यात बर्ड फ्लू ने शिरकाव केला असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी, बीडमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तसे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. परभणीच्या मुरुंबा गावात ८०० पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला आहे. राज्य सरकारनेही या प्रकाराची दखल घेतली आहे. तातडीने रॅपिड रिस्पॉन्स टीम राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, राज्य सरकारने यासाठी २४ तास सेवा देणारी हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1348539925105319938