नाशिक – कोरोना रुग्णांसाठी उपचारार्थ अत्यावश्यक असलेल्या रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवड्या झाल्याने आता त्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. बाजारात चक्क बनावट रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची सर्रास विक्री सुरू झाली आहे. तब्बल ३५०० रुपयांना हे इंजेक्शन विक्री केले जात आहे.
युवा नेते आणि अॅडव्होकेट अजिंक्य गिते यांनी यासंदर्भातील प्रकार उजेडात आणला आहे. गीते यांनी सांगितले की, रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. माझ्या मित्राचा कुटुंबियांना इंजेक्शन हवे होते. मित्राने अमोल देसाई नामक व्यक्तीशी संपर्क साधला. देसाईने ३५०० रुपयांप्रमाणे इंजेक्शन दिले. हे सर्व इंजेक्शन्स नकली निघाले. इंजेक्शनच्या बॉटलवर फेविक्विकने रेमेडेसिव्हिरचे लेबल चिकटवले होते. ही बाब समोर आल्यावर देसाईला जाब विचारण्यात आला. त्यानंतर देसाईने पैसे परत आणून दिले. आणि आता हे खोटे इंजेक्शन्सही तो तो परत मागत आहे, असे गिते यांनी सांगितले आहे.
बघा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=825674044713070