मुंबई – गुगल असे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर आज आपण प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यासाठी करतो. कारण त्यावरील माहिती शंभर टक्के खरी आहे, याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. मात्र हाच गुगल आपल्यावर स्मार्टफोनच्या माध्यमातून पूर्ण लक्ष ठेवून आहे.
गुगलला हे देखील माहिती असते की आत्ता आपण कुठे जातोय आणि काय शोधण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आपल्या सेवा अधिक उत्तम करण्यासाठीच गुगल आपला डेटा वापरत असतो. मात्र तरीही आपल्याला असे वाटते की गुगलने आपले लोकेशन ट्रॅक करू नये, तर काय करावे, हे आज आपण जाणून घेऊया.
लोकेशन ट्रॅकिंग
लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात आपल्या डिव्हाईसच्या सर्व एपचे लोकेशन डेटा परमिशन ब्लॉक करा. अँड्रॉईड फोनमध्ये सेटींगमध्ये जा आणि त्यानंतर लोकेशन डेटावर क्लिक करा. त्यानंतर लोकेशन परमिशनवर लेफ्ट स्वाईप करा आणि टर्न आफ करा. त्याचप्रमाणे लोकेशन परमिशनला टर्न आनदेखील करता येते.
तसेच दुसराही एक पर्याय आहे. गुगल अकाऊंटच्या लोकेशन हिस्ट्री फिचरला टर्न आफ करा. त्यामुळे सर्व गुगल एप आणि सर्व्हिसला सिंगल स्वाईप करून बंद करता येईल. त्यासाठी गुगल अकाऊंटच्या सेटिंग आप्शनवर क्लिक करा आणि त्यात मॅनेज युवर गुगल अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर प्रायव्हसी अँड पर्सनलायझेशनमध्ये जा. त्यात अॅक्टीव्हीटी कंट्रोल सेक्शनमध्ये लोकेशन हिस्ट्रीवर क्लिक करा. त्याला लेफ्ट स्वाईप करून टर्न आफ करा.
गुगल सर्चमध्ये लवकर डार्क मोड
गुगल सर्च वेबसाईटने गेल्यावर्षी डेस्कटॉपसाठी डार्क मोडची सविस्तर चाचणी केली होती. आता आणखी एका अहवालात दावा करण्यात आला आहे की कंपनीने पुन्हा एकदा डार्क मोडच्या टेस्टींगला सुरुवात केली आहे. गुगलचे डार्क मोड फिचर अँड्रॉईड युझर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र आता लवकरच डेस्कटॉप युझर्ससाठीही येणार आहे.