नवी दिल्ली – कोरोनाच्या नवीन प्रकारात संसर्गग्रस्त रूग्णांमध्ये या रोगाची लक्षणे झपाट्याने बदलत आहेत. घसा, फुफ्फुस आणि मेंदूनंतर आता त्याचा परिणाम पोटावर दिसून येतो आहे. तसे, डॉक्टरांच्या निदर्शनास येत आहे.
दिल्लीतील दोन शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना ओटीपोटात वेदना, उलट्या आणि अतिसार सारखी लक्षणे आढळली आहेत. संसर्गाच्या बदलत्या विषाणूमुळेही लक्षणेही बदलत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दिल्लीत कोरोनाची सुमारे ६ लाख ५० हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील बहुतेक रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यात अडचण, कोरडा खोकला अशी लक्षणे आहेत. सुमारे ३० टक्के रुग्णांना वास येत नाही किंवा अन्नाची चव न जाणवण्याची लक्षणे आहेत.
या हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने सांगितले की, गेल्या एका आठवड्यापासून रूग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर रूग्ण कदाचित दक्षिण आफ्रिकेमधील नव्या प्रकारच्या कोरोनाने ग्रस्त आहे आणि यामुळे त्यांना नवीन लक्षणे उद्भवली आहेत. ती शोधण्यासाठी रुग्णांच्या स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत. ते आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना मधुमेहाची तक्रार कधीच झाली नव्हती, परंतु दरम्यान तपासणीनंतर या संक्रमित लोकांच्या मधुमेहाची पातळी ४०० पेक्षा जास्त असल्याचेही आढळून आले आहे.