नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या काळात घरबसल्या लोन देणाऱ्या कंपन्या आणि मोबाईल अँप्लिकेशन्सची मोठ्या प्रमाणात चलती आहे. मात्र, इन्स्टंट लोनच्या नावाखाली फसणूक होत असल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहे. लोनच्या नावाखाली आकर्षक योजना सांगून ग्राहकांना फसवले जाते. त्वरित लोन देण्याचे सांगून ग्राहकांमधून मोठी रक्कम फी स्वरूपात घेणाऱ्या अँप्लिकेशन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
कोरोना महामारीच्या काळात तत्काळ लोन मिळेल या आशेने ग्राहक वर्ग अशा प्रकारच्या फसवणुकीला बाली पडतो. अशा अँप्लिकेशन्सद्वारे ५० हजार रुपयांपर्यंत लोन देण्यासाठी अंदाजे १०० ते ५०० रुपये एवढी फी आकारली जाते. मोबाईल अँप्लिकेशन्सवर नियंत्रण असलेल्या अॅप्सफ्लायरच्या मते लोन देणारे अॅप डाउनलोड करण्यात भारत अग्रस्थानी आहे.
इन्स्टंट लोनच्या नावाखाली सर्वाधिक फसवणूक होण्याचे प्रकार भारतात घडत असल्याचे उघड झाले आहे. लोन देणाऱ्या कंपन्या तसेच अॅप कोणत्याही प्रकारची फी आकारत नाही, प्रोसेसिंग फीमध्ये ही रक्कम वजा केली जाते त्यामुळे अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडून नये असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच लोन देणाऱ्या कंपन्या ईमेलद्वारे शहानिशा करत असतात.
थेट फोनद्वारे कोणतीही कंपनी तसेच अॅप लोन देत नाही असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. लोन देतेवेळी सर्व कागदपत्रे तपासल्यावर कंपनी लोन देत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फोनवर किंवा अॅपवर इन्स्टंट लोन दिले जात नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.