नवी दिल्ली – देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरच्या सर्व मार्गिका आजपासून (१५ फेब्रुवारी) फास्टटॅग लेन्स सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग शुल्क २००८ या कायद्यान्वये फास्टटॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यावर्षी १ जानेवारीपासून फास्टटॅग सक्तीचे करण्यात आले होते. त्यानुसार प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या अनुक्रमे एम आणि एन वर्गवारीतल्या वाहनांना फास्टटॅग लावणं बंधनकारक होतं. मात्र आजपर्यंत १५ फेब्रवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, आता मुदतवाढ न देता फास्टॅग सक्तीचा झाला आहे.
आज जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात FASTag बसवणे अनिवार्य केले होते.
प्रवर्ग ‘एम’ म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन आणि ‘एन’ मालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.