मुंबई – महाराष्ट्रातील सर्वसामान्य नजता एकीकडे कोरोनाशी संघर्ष करीत असतानाच अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात तीन दिवसांआड दोनवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. आता आज पहाटे मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर भागांमध्ये १८ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यामुळे आज आणि उद्या आणखी एकदा अवकाळी पावसाचे आगमन शेतकऱ्यांच्या चिंचेत भर घालू शकतो.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला. तालुक्यातील हसनबाद, तळेगाव, सुरंगळी येथे पहाटे 5च्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जवळपास अर्धा तास झालेल्या या पावसामुळे जागोजागी गारांचा खच पडला होता.
दुसरीकडे विदर्भातील वाशीम जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे या भागातील फळबागांसह रब्बी पिकाला मोठा फटका बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. लातुर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1373135281470107649