बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधानतेने वापरा हॉटेल व लॉज सुविधा!

by Gautam Sancheti
जुलै 25, 2020 | 12:57 pm
in इतर
0
Applying safety measures (Covid-19 or coronavirus).

Applying safety measures (Covid-19 or coronavirus).


कोरोनासोबत जगताना अनेक अत्यावश्यक बाबी पुढच्या काळात कराव्या लागणार आहेत. कामांसाठी, व्यवसायासाठी व शिक्षण प्रशिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास व अनुषंगिक हॉटेल व लॉज सुविधा वापरणे अनिवार्य ठरते. अशावेळी आता पूर्वीसारखे बिनधास्त जगणे मात्र असणार नाही. हॉटेल व्यावसायिकांना काही अटी व शर्तीवर मर्यादित स्वरूपात हॉटेल सुरू करायला परवानगी मिळाली आहे. सोबतच हॉटेल मालकासह ग्राहकांनी देखील काळजी घेणे महत्त्वाचे ठरले आहे.

पुढील काही महिने हॉटेलमध्ये थांबणे ही बाब अतिशय आवश्यकता असेल तेव्हाची सुविधा असणार आहे. तरीही अशी वेळ आलीच तर आता आरोग्यसेतु द्वारे आपली माहिती देणे अनिवार्य ठरले आहे.

हॉटेलमधील निवासामध्ये आता सेल्फ सर्विसला अधिक महत्त्व येणार आहे. त्यामुळे अधिक आदरातिथ्याची अपेक्षा न ठेवता जिथे राहायला जाल त्या ठिकाणी कमीतकमी लोकांचा संपर्क येईल. कर्मचाऱ्यांचा कमी संपर्क येईल, यासाठी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक असणार आहे.

कमी संपर्क, कर्मचाऱ्यांचा कमी प्रत्यक्ष संपर्क, जलतरण तलाव, व्यायामशाळा, मुले खेळण्याचे क्षेत्र, गेमिंग आर्केट आदींचा वापर टाळावा लागणार आहे. रेस्टॉरंट ऐवजी आपल्या कक्षातच जेवण घेणे आता योग्य ठरणार आहे. थोडक्यात  योग्य ती काळजी घेणे आता ग्राहकांची देखील हॉटेल मालकासोबत जबाबदारी झाली आहे.

कोरोनाच्या काळामध्ये ही संबंधित आस्थापने चालविण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना ठरवलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निवासाची सोय असलेले हॉटेल, लॉज, खाजगी विश्राम गृह सुरू करता येणार आहे. निवासाची व्यवस्था असणारी लॉज, हॉटेल, खाजगी विश्रामगृह यांचेकरीता मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे आहेत.

अतिथींसाठी सूचना :

केवळ कोविड-19 सदृश्य लक्षणे नसलेल्या अतिथींना परवानगी असेल. जे अतिथी फेसकवर, मास्क लावले असतील त्यांना प्रवेश देण्यात यावा. सदर ठिकाणी कायम मास्कचा वापर करणे आवश्यक राहील.

स्वागतकक्ष यांचेकडून अतिथींची संपूर्ण माहिती (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती इ) त्याचप्रमाणे आयडी कार्ड व सेल्फ डिक्लरेशन फार्म भरुन घेणे आवश्यक राहील. अतिथी व कार्यरत कर्मचारी यांना आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. अतिथींना सेवेसाठी कर्मचाऱ्यांचा कमीत-कमी वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात यावेत.

अतिरिक्त व्यवस्था सुनिश्चित करणे :

प्रवेश व्दारावर कोविड-19 विषयी प्रतिबंधात्मक उपायाबाबत मार्गदर्शक तत्वे पोस्टर्स, स्टॅण्डिज, दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) इत्यादी साधनाव्दारे स्पष्टपणे दर्शविली जातील. हॉटेलमध्ये तसेच बाहेरील पार्किंगमध्ये वाहनतळांचे योग्य व्यवस्थापन केले जाईल. रांग व्यवस्थापित करण्यासाठी विशिष्ट खुणा केल्या जाऊ शकतात आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा बसण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.

या आस्थापनामध्ये बाहेरील व्यक्तीकडून प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक राहिल. तसेच रिसेप्शन टेबल, त्याजवळील जागेत संरक्षक काच लावण्यात यावा. अतिथींकरिता पॅडलवर चालणाऱ्या हॅन्ड सॅनिटायजर याची व्यवस्था ठेवावी. अशी व्यवस्था प्रवेशव्दार, रिसेपनिस्ट अतिथींच्या खोल्या, सार्वजनिक खुली जागा (लॉबी इ) येथे करावी.

सदर आस्थापना संचालकांकडून अतिथीस तसेच कार्यरत कामगारांस फेस कवर, मास्क, हँडग्लोव्हज इत्यादी वैयक्तिक संरक्षणात्मक साहित्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. वरील आस्थापना संचालकाकडून कान्टॅक्टलेस प्रक्रिया जसे क्यूआर कोड, ऑनलाईन फार्म, डिजिटल पेमेंट्स, ई-वॉलेट इत्यादींचा वापर, चेक-इन, चेक-आउट याकरीता करणे आवश्यक राहील.

हॉटेल, लॉज, खाजगी विश्रामगृह इत्यादी ठिकाणी असलेल्या लिफ्टमधील अतिथींची संख्या प्रतिबंधीत ठेवण्यात यावी व सामाजिक अंतराचे निकष योग्य प्रकारे पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी. वातानुकूलन, व्हेंटिलेशनसाठी, सीपीडब्लुडीच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण केले जाईल. जे सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान सेटिंग 24-30 डिग्री सेल्सीअसच्या श्रेणीत असले पाहिजेत. सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्केच्या श्रेणीत असावी, ताजी हवेचे प्रमाण शक्य तितके जास्त असले पाहिजे आणि क्रॉस वेंटीलेशन पुरेसे असावे.

सुविधांचा वापर :

रेस्टॉरंटसाठी जारी केलेल्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जाईल. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी आसन व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक राहील. ई-मेनू आणि डिस्पोजेबल नॅपकिंगचा वापर करण्यास ग्राहकांस प्रोत्साहित करावेत. अतिथींना एकत्र जेवना ऐवजी खोलीमध्ये जेवन, नाश्ता करण्यास प्रोत्साहित करावे. केवळ निवासी अतिथींकरिता रेस्टॉरंट काटेकोरपणे उपलब्ध असतील.

गेमिंग आर्केड, मुले खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव, व्यायामशाळा (जिथे लागु असेल तिथे) बंद राहतील. हॉटेल, लॉज, खाजगी विश्रामगृहे यामध्ये मोठी संमेलने, गर्दीस कायमच निषिध्द आहेत तथापी जास्तीत जास्त 15 सहभागींच्या अधीन राहुन 33 टक्के क्षमतेवरील मीटींग हॉलचा वापर करण्यास परवानगी असणार आहे.

स्वच्छता, सॅनिटायजेशन, निर्जंतुकीकरण :

अतिथींकडून खोली रिकाम्या करण्यात आल्यानंतर प्रत्येक वेळी खोली व इतर जागांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. अतिथीचा मुक्काम संपल्यानंतर खोली कमाल 24 तास रिकामी ठेवुन खोलीतील सर्व तागाचे कपडे, टॉवेल्स इत्यादी बदलून घ्यावीत.

हॉटेलमधील शौचालय, पाणी पिण्याची, हात धुण्याची जागा इत्यादीवर विशेष लक्ष केंद्रित करुन सदर जागेची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. सर्व अतिथी सेवा व सामान्य भाग जसे डूवरनॉअब्स, एलीवेटर बटन, हॅन्डरेल, बेंचेस, वाशरूम  फिक्चर्स यांच्या स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची (1% सोडियम हायपोक्लोराइट वापरुन) नियमित स्वच्छता करणे आवश्यक राहील. नियमित अंतराने सर्व स्वच्छतागृहे, बाथरुमची स्वच्छता करणे आवश्यक राहील.अतिथींकडून किंवा कर्मचारी यांचेकडून वापरण्यात आलेल्या फेस मास्क, हॅण्डग्लोव्हज यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक राहील.

परिसरात संशयित किंवा पुष्टी झालेल्या प्रकरणात आवश्यक कारवाई :

आजारी व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीस वेगळ्या खोलीत ठेवण्यात यावे. जेणेकरुन सदर व्यक्ती इतरांपासुन वेगळा राहील. जवळच्या वैद्यकीय सुविधा (रुग्णालय, क्लिनीक) यांना त्वरीत कळवा किंवा राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईनवर कॉल करावा.

नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा आरआरटी, उपचार करणारे डॉक्टर) जोखमीचे मुल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार प्रकरण त्यांचे, तिचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण आवश्यक असल्याचे व्यवस्थापन या संदर्भात कार्यवाही सुरु केली जाईल. जर एखादी व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्यास सदर परिसरास निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.

(जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑगस्टपर्यंत देशात २० लाख बाधित

Next Post

मोडीची वाढती गोडी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
modi lipi photo 750x375 1

मोडीची वाढती गोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला हा स्पष्ट आदेश….

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011