नवी दिल्ली : सध्याच्या काळात तरुण – तरूणींना बँकेत नोकरीची चांगली संधी आहे, आपल्या देशातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या सारस्वत सहकारी बँक लिमिटेडने विविध राज्यांत ग्रेड बी त्या म्हणजे कारकुन संवर्ग पदाच्या भरतीची एकूण १५० जागांसाठी जाहिरात दिली आहे
कनिष्ठ अधिकारी, ग्रेड बी मधील विपणन आणि संचालन पदांकरिता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतील विविध शहरांमध्ये असलेल्या एकूण १५० रिक्त जागांवर ही भरती होणार आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट saraswatbank.com वर दिलेल्या ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी आहे.
बँक कनिष्ठ अधिकारी भरतीकरिता किमान ६० टक्के गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून वाणिज्य किंवा विज्ञान किंवा व्यवस्थापन विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी, अशा विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी. या व्यतिरिक्त १ फेब्रुवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
बँकेत कनिष्ठ अधिकारी पदाच्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीनुसार निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात १६० मिनिटांची ऑनलाईन चाचणी घेण्यात येणार आहे, ज्यात सर्वसामान्य ज्ञान किंवा आर्थिक विषयांत माहिती , सामान्य इंग्रजी आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड असे एकूण १९० प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी जास्तीत जास्त २०० गुण विहित आहेत आणि किमान ५० टक्के गुण मिळल्यास त्यांना परीक्षेत उत्तीर्ण केले जाईल. परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार पुढील टप्प्यातील मुलाखतीसाठी उमेदवारांना आमंत्रित केले जाणार आहे. परिक्षेकरिता ७५० रुपये अर्ज शुल्क असून ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट्स आदीद्वारे शुल्क भरता येईल.