नाशिक – आज सारथ्य मानसोपचार, पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्राचा तिसरा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक सायकीयट्रिक सोसायटीचे अध्यक्ष, जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. बी. एस. व्ही. प्रसाद उपस्थित होते. त्याचबरोबर सचिव व जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ उमेश नागपूरकर, मानसोपचार तज्ञ डॉ निलेश जेजुरकर यांची देखील विशेष उपस्थिती होती. या निमित्ताने सर्व स्टाफ व रुग्णांनी व्यसनाच्या व मानसिक आजारांच्या समस्येवर एक नाटिका सादर केली. सारथ्यचे संस्थापक डॉ. अनुप भारती यांनी नमूद केले की गेल्या ३ वर्षांमध्ये ३५० हुन अधिक रुग्णांवर ऍडमिट करून उपचार करण्यात आले, त्याचप्रमाणे २००० हून अधिक ECT उपचार देण्यात आले, अनेक रुग्णांसाठी ग्रुप थेरपी,आर्ट थेरपी, म्युसिक थेरपी, योगा, समुपदेशन व रुग्णाच्या नातेवाईकसाठी मार्गदर्शनपर सेशन्स घेण्यात आले. सारथ्यचे संस्थापक डॉ नकुल वंजारी यांनी सारथ्यचा गेल्या ३ वर्षाचा प्रवास, आलेले विविध अनुभव व रुग्ण व्यसनमुक्त झाल्यानंतर किंवा मानसिक आजारातून बरा झाल्यानंतरचे समाधान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
डॉ बी. एस. व्ही. प्रसाद यांनी सारथ्यच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व अशा सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य केंद्राची नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यकता होती असे नमूद केले. संस्थापक मानसोपचार तज्ञ डॉ. स्वाती वंजारी यांनी उपस्थित रुग्ण, नातेवाईक यांना मानसिक आजार व व्यसनमुक्ती संबधी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. नागापूरकर व डॉ. जेजुरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र संचालक डॉ. प्रियांका भारती यांनी आभार प्रदर्शन केले. सारथ्य केंद्रातील सायकॉलॉजिस्ट आकाश गाढे, ह्रषिकेश सपके व सर्व नर्सिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ समाधान, राकेश, रुपसिंग, प्रतिमा, अरुणा, कल्पना व गणेश यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.