मुंबई – बीईंग रिस्पॉन्सिबल नेटिझन्स या उद्दिष्ठाखाली अहान फाउंडेशन, मुंबईतर्फे मार्गदर्शनपत्र सत्र आयोजित करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने आयोजित चर्चासत्रात लहानमुले तसेच महिला सबलीकरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अहान फाउंडेशनच्या वतीने जबाबदार नेटीझन्सच्या भूमिकेत सबलीकरण तसेच जागरूकतेचे काम सुरु आहे.
लहानमुले तसेच महिला सबलीकरणासाठी काम करतांना येणाऱ्या अडचणी, त्याचे निरनिराळे पैलू चर्चासत्रात उलगडण्यात आले. संस्थापक संचालिका सोनाली पाटणकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सायबर क्राईमचे बळी न ठरता योग्य पद्धतीने तक्रार करून त्यातून बाहेर पडण्याच्या पद्धती त्यांनी यात सांगितल्या. हा कार्यक्रम युट्युबवर आयोजित करण्यात आला होता.
२०१२ पासून मुंबई सह उपनगरांतील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची माहिती देण्याचे काम अहान फाउंडेशन करते आहे. यास पाठिंबा म्हणून ठाणे व मुंबई सायबर सेलने यात सहभाग घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील ८ लाख विद्यार्थ्यी आणि पालकांमध्ये सायबर सुरक्षेची माहिती पोहोचवली आहे. तसेच जनजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणात अहान फाउंडेशन महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याचप्रमाणे तरुणांमध्ये जागरूकता यावी यासाठी ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहेत. २०१६-१७ तत्कालीन सरकारने संस्थेच्या याकार्याची दखल घेतली आहे. चर्चासत्रात सल्लागार डॉ. मुकुल जोशी उपस्थित होते.
कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा