नाशिक – डिजिटलायझेशनकडे यशस्वी वाटचाल करत असतांना त्यातील संभाव्य धोके वेळीच ओळखणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षात ऑनलाईन मार्केटिंग, ऑनलाईन बँकिंग तसेच एटीएम कार्ड यांद्वारे होणाऱ्या सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
सध्या फोनद्वारे किंवा मेसेजच्या साहाय्याने हॅकर लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. याच धर्तीवर मध्य महाराष्ट्रातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित जनजागृतीवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. २९ सप्टेंबरला संध्याकाळी ५ ते ६.३० यावेळेत ऑनलाईन पद्धतीने हे वेबिनार होणार आहे. यात सायबर पोलीस स्टेशन, पुणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे मार्गदर्शन करणार आहेत. सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर कशा प्रकारे मात करावी यासाठी हे वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायबर कायदा, त्यातील तरतुदी यात स्पष्ट करण्यात येणार आहेत. वेबिनारसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. http://bit.ly/web-abgp-2 येथे नोंदणी करावी, असे आवान करण्यात आले आहे.