नवी दिल्ली – वैज्ञानिक शोध संस्थांवर प्रभाव टाकल्यानंतर ७३ वर्षीय आयआयटीएन निरुपमा गुप्ता आता मुखर्जी नगरातील एक हजार फ्लॅटवाल्या सोसायटीतील कामासाठी चर्चेत आहे. मूळ उत्तर प्रदेशमधील अलीगडच्या असलेल्या निरुपमा गुप्ता वयाची बंधने नाकारुन काम करीत आहेत. रुडकी येथून आयआयटी केल्यानंतर निरुपमा यांनी सरकारी नोकरी केली. पुसा पॉलिटेक्निकची एचओडी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि दहा वर्षे कार्यकारी प्राचार्य राहिल्या आहेत.
सरकारी सेवेतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या अवाक्यातील ते प्रत्येक काम केले ज्यातून समाजाला काही उपयोग होऊ शकेल. आपल्या कॉलनीत ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी त्यांनी प्रत्येक घरात जाऊन माहिती दिली. ज्येष्ठांना अचानक येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारींबाबत जनजागृती केली. अनेकांना वाचविलेही. सकाळी बागेत योग शिक्षण देणे त्यांचे आवडते काम आहे. संस्कारशाळेच्या माध्यमातून मुलांना आपल्या परंपरांशी जोडत आहे. ही सर्व कामे त्या स्वतःच्या खर्चातून करीत आहे, हे विशेष. बालसंस्कार शाळेत इंग्रजीमुळे मातृभाषेपासून लांब गेलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या भाषेतील साहित्य दर्शन त्या घडवित आहेत. त्यासाठी काही पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात आणि पुस्तके उपलब्धही करून देतात.
कचरा उचलणाऱ्यांशी संवाद
पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी त्या कचरा उचलणाऱ्यांसोबत संवाद साधतात. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा राहावा, यासाठी त्या प्रयत्न करीत आहे. आपल्या मैत्रीणींसोबत मिळून प्रत्येक घरात जाऊन कचरा पेटी वाटत आहे.