नाशिक – सामनगाव बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयात प्रत्यक्ष येऊन चौकशी केली. ९ जानेवारी रोजी सामनगाव नाशिक येथे सायंकाळच्या सुमारास अरिंगळे मळा भागात एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या बलात्कारातील पीडितेची रूपाली चाकणकर यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात डाॅ. श्रीवास यांच्या समवेत भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली तसेच पीडितेच्या आई वडिलांशी चर्चा करून राष्ट्रवादी महिला काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. यानंतर दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी पोलिस उपायुक्त विजय खरात यांची ही भेट घेतली. आरोपींना सात दिवसाची कोठडी मिळाली आहे मात्र बलात्कारातील आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी देखील केली.
महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, ग्रामीण अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, कार्याध्यक्ष नगरसेविका सुषमा पगारे, विधानसभा अध्यक्ष पुष्पलता राठोड, रंजना गांगुर्डे, विभागीय अध्यक्षा संगिता गांगुर्डे, सरिता पगारे, सलमा शेख, रूपाली पठारे, अपेक्षा अहिरे, शहर पदाधिकारी वैशाली ठाकरे, लता चौधरी, सुजाता कोल्हे, सुनिता थिगळे, राजश्री कदम, स्वाती बिडला, संगिता भामरे, योगिता आहेर, मंगला मोरे, कौसर काझी, सुजाता गाढवे, मनिषा पवार, अलका भोर आदि महिला उपस्थित होत्या.